सांगली : बेळगांव तालुका रुरल इंडस्ट्रीयल को- ऑप. क्रेडिट सोसायटीचा सुवर्ण महोत्सव रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभास आपण जरुर उपस्थित राहू, असे महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.
सोसायटीच्या संचालक मंडळाने नुकतीच पाटील यांची भेट घेऊन त्यांना समारंभाचे निमंत्रण देऊन उपस्थित राहण्याची विनंती केली. चेअरमन रमेश मोदगेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन जयंतराव पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील, मिलिंद पावशे, उदय किल्लेकर, मल्लाप्पा चोगुले, शिवाजी शहापूरकर, मारुती सदावर व जनरल मॅनेजर जयवंत खन्नूकर, प्रा. आनंद मेणसे, प्रकाश मरगाळे, कृष्णा शहापूरकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta