बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे जलतरणपटू अनिश पै आणि अनन्या पै यांनी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे मुंबई येथे आयोजित संक रॉक लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतच्या सागरी जलतरण शर्यतीत विजय संपादन केला आहे.
सदर शर्यतीच्या मुलांच्या विभागात होतकरू जलतरणपटू अनिश पै याने आपल्या वयोगटाचे (गट दुसरा 3 कि.मी. जलतरण) विजेतेपद हस्तगत करण्याबरोबरच सर्वात वेगवान जलतरणपटूसाठी असलेला स्पर्धेचा करंडक जिंकला. त्याचप्रमाणे मुलींच्या विभागात अनन्या पै हिने आपल्या वयोगटात नववा क्रमांक मिळवत 5 कि.मी. अंतराची शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली. ही दोन्ही भावंड शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. त्यांना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन, तसेच आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, लता कित्तूर, माणेक कापडिया, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल अनिश आणि अनन्या यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.