Thursday , March 5 2026
Breaking News

प्रभावती फाउंडेशनतर्फे उद्या “रंग बरसे” कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांच्या प्रभावती फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी बीएससी मॉलच्या बाजूला असलेल्या शुक्रवार पेठ येथील खुल्या जागेत होळी निमित्त “रंग बरसे” हा महिलांसाठी रंगोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सकाळी आठ ते दुपारी दोन यावेळेत होणार आहे. या कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना बक्षीसही देण्यात येईल. या “रंग बरसे” कार्यक्रमात मुलांनाही सहभाग होता येते. त्यांच्यासाठीही विविध बक्षिसांची योजना आखण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रभावती मास्तमर्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, दक्षिण मतदार संघातील गरजू आणि गरजवंत लोकांच्या मदतीसाठी मी माझ्या फाउंडेशनच्या वतीने मदत करण्यासाठी नेहमी आघाडीवर असते. अनेकांना शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत आपण मिळवून दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस पक्षाकडे दक्षिण मतदार संघातून आपणाला तिकीट मिळावे अशी विनंती पक्षप्रमुखांकडे केली असल्याची त्यांनी माहिती दिली. आपण केलेल्या सामाजिक कार्याची माहिती घेऊन आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *