मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक संपन्न
बेळगाव : येत्या २७ मे २०२३ रोजी होणाऱ्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता साईगणेश सोसायटी सभागृह बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नेताजीराव जाधव होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहित्यामुळे यावर्षी शिवजयंती नंतर चित्ररथ मिरवणूक पूढे ढकलण्यात आली होती ती आता येत्या 27 मे रोजी होणार आहे तेव्हा शहापूर विभागातील श्री शिवजयंती मंडळांना काही अडचणी आल्यास त्यांनी शहापूर महामंडळाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच 27 रोजी महामंडळाच्या वतीने बॅ. नाथ पै चौक येथे सर्व चित्ररथांचे स्वागत करण्यात येणार आहे तसेच पहिल्या गाड्याचे पूजन संध्याकाळी 6.00 वाजता करण्यात येईल असे नेताजीराव जाधव यांनी सांगितले. तसेच सर्वानी शांततेत आणि सलोख्याने सदर मिरवणूक संपन्न करावी व वेळेवर सुरू करून शिवप्रेमींना व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीला हिरालाल चव्हाण, श्रीकांत प्रभू, नगरसेवक नितीन जाधव, सेक्रेटरी श्रीकांत कदम, सुधीर कालकुंद्रीकर, रवींद्र शिगेहळीकर, अभिजित मजुकर, सुरज कडोलकर, शिवकुमार मनवाडकर, सुरज लाड, श्री. चौगले आदी उपस्थित होते. आभार पी. जे. घाडी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta