बेळगाव : गाणिग समाज अभिवृद्धी संघाच्यावतीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. नेहरूनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र काकती होते. समाजाचे अध्यक्ष प्रकाश बाळेकुंद्री यांनी एस. जी. बाळेकुंद्री, डॉ. विजया यांच्यासारख्या महान व्यक्तीविषयी माहिती दिली. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी सुजाता बाळेकुंद्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नेत्रावती बाळेकुंद्री यांनी आयएएस, केएएस प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.
एकूण ७४ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गाणिग देवतेचा फोटो, पुस्तके, रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी संजय बाळेकुंद्री, विद्याधर तेरणी, संजीव बाळेकुंद्री, आनंद बागेवाडी, सदानंद हलगी यासह इतर उपस्थित होते.