बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने मराठी विद्यानिकेतन बालवाडीसाठी खेळाचे साहित्य भेट देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, सदस्य महेश अनगोळकर, सोमनाथ कुडचीकर, डी. बी. पाटील उपस्थित होते.
शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. रोटरीच्या वतीने बालवाडी च्या मुलांसाठी फिरता झोपाळा, स्प्रिंग डक यासारखे खेळाचे साहित्य बालमंदिरच्या परिसरात बसवून देण्यात आले. मुलांची खेळाची आवड लक्षात घेऊन मनोरंजक खेळणी भेट दिल्याबद्दल सुभाष ओऊळकर यांनी रोटरी क्लबचे आभार मानले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य प्रा. सुरेश पाटील, शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, बालमंदिर प्रमुख सीमा कंग्राळकर, बालमंदिर शिक्षिका अश्विनी हलगेकर, वरदा देसाई व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक गजानन सावंत यांनी आभार व्यक्त केले..
Belgaum Varta Belgaum Varta