Thursday , March 5 2026
Breaking News

अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाबाबत कार्यवाही करा; पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

Spread the love

 

बेळगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव महानगर पालिका तसेच प्रादेशिक कार्यालयासमोर अनधिकृतपणे फडकत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वारंवार निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडून आजवर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वजासमोर अनधिकृत लाल पिवळे झेंडे फडकवून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितजी शहा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, या संदर्भात कर्नाटकच्या मुख्य आयुक्तांनी कार्यवाही करण्याचे निर्देश मार्च महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी अनधिकृत लाल पिवळ्या झेंडे काढण्यासंदर्भात कोणती पावले उचलली याची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाबाबत कार्यवाही करून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांना सूचना देण्याचे पत्र पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना पाठविले असून मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *