Monday , September 21 2026
Breaking News

दूरशिक्षण केंद्राच्या वतीने बेळगाव येथे प्रवेश प्रक्रियेबाबत उद्बोधन वर्गाचे आयोजन

Spread the love

 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र मार्फत शैक्षणिक वर्ष 2023 – 24 साठी बी.ए.,बी.कॉम., एम.ए.(मराठी हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र) एम.कॉम.,एम.एस्सी व (गणित) या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने बेळगांव येथील सीमा भागातील विद्यार्थी, गृहिणी, कामगार, शेतकरी यांच्यासाठी सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन,ओरिटल स्कूल जवळ बेळगाव येथे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी समन्वयक प्रा. डॉ. के. बी. पाटील उद्बोधन वर्ग घेणार असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे सचिव व बेळगांव महानगरपालिकेचे माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, सहा.प्रा.डॉ. सचिन भोसले, डॉ.चांगदेव बंडगर, डॉ.सुशांत माने, डॉ.मुफीद मुजावर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व प्रवेश इच्छूक व अभ्यागत यांनी उदबोधन वर्गास उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के. मोरे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *