Monday , December 15 2025
Breaking News

येळ्ळूरमधील अंगणवाडीत सडलेले धान्य

Spread the love

येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सदस्यांची धडक मोहीम

 

बेळगाव : येळ्ळूर गावातील सर्व अंगणवाड्यामध्ये लहान मुलांना सरकारकडून येणारे धान्य एकदम खराब व सडलेले असल्याचे निदर्शनास आले. अंगणवाड्यामध्ये गुळ, डाळ, रवा, शेगां यामध्ये अळी झाल्या होत्या. हेच धान्य लहान मुलांना देण्यात येते. सरकार प्रत्येकवेळी मुलांना निरोगी राहा, स्वच्छ राहा, चांगला आहार खा, आरोग्य जपा असे सांगत असते पण अधिकारी मात्र अंगणवाडीच्या मुलाना सडलेले धान्य देतात. हा प्रकार या भागातील अंगणवाडी सुपरवायझर पार्वती हाणबर यांच्या निर्दशनास आणण्यात आला. अनेकवेळा गावातील  नागरिकानी तक्रारी केल्या होत्या. ग्राम पंचायतने संबंधित खात्यावर योग्य कारवाई करावी, असे वरिष्ठांना खडसावून सांगण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *