Monday , December 15 2025
Breaking News

पेपर टाकणाऱ्या मुलाला विजेचा धक्का

Spread the love

 

बेळगाव : परगावाहून बेळगावात आलेल्या 14 वर्षाच्या रजत गौरव नावाच्या मुलाला आज शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास विजेच्या धक्क्याने मोठा आघात केला आहे. घटनेची माहिती मिळतात टिळकवाडी पोलीस घटनास्थळी हजर झाले असून पुढील चौकशी सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुळचा उत्तर प्रदेश येथील व सध्या रघुनाथ पेठ अनगोळ येथे राहणारा रजत गौरव हा दररोज सकाळी हिंदवाडी परिसरात पेपर टाकण्याचे काम करत असतो. आज शनिवारी ही सकाळी नेहमीप्रमाणे पेपर टाकून तो गोमटेश जवळून भाग्यनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील एका बंगल्यात पेपर टाकण्यासाठी गेला. त्यावेळी अन्य कामासाठी बंगल्यात गेल्यानंतर त्याला बंगल्याच्या आवाराच्या जाळीतून वाहणाऱ्या वीज प्रवाहाचा जबर धक्का बसला. सदर घटनेत रजत गौरव हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रजतचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजितची प्रकृती गंभीर असल्याच्या कळते.

सदर घटनेची माहिती मिळताच काही पेपर विक्रेत्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. टिळकवाडी पोलीससही पुढील चौकशी करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आईच्या बाराव्या दिवशी जपली सायनेकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी!

Spread the love  बेळगाव : आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेकजण परोपकार करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *