Thursday , March 5 2026
Breaking News

बसवण कुडची येथे शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक

Spread the love

 

बेळगाव : तानाजी गल्ली बसवण कुडची येथील अशोक बाबू लक्ष्मनावर यांच्या घराला आज सकाळी 6 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.
गल्लीतील नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आगीने तोपर्यंत रौद्ररूप धरण केले होते. आगीत घरातील पफ्रिज, कपडे, घराचे कागदपत्रे, खुर्ची, खाऊक पदार्थ सर्व जळून गेले आहे.

आग लागलेली समजताच नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी तातडीने त्यांची अशोक लक्ष्मनावर यांची भेट घेऊन झालेले नुकसान पाहणी करून त्यांना आर्थिक मदत केली.
यावेळी गल्लीतील नागरिकांनी आग विजवण्यासाठी परिश्रम घेतले.

नगरसेवक बसवराज मोदगेकर आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. तसेच तलाठी नयना गौडा यांनीही फोन करून विचारपूस केली व तलाठी कार्यालयातून राजू पोनजी यांना घटनास्थळी पाठवले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *