बेळगाव : कायदा आणि संसदीय मंत्री जे. सी. मधुस्वामी यांच्याविरोधात कायद्याचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. बेळगाव सुवर्णविधानसौधमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मधुस्वामी युके 27 या हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी मधुस्वामी यांच्या विरोधार्थ विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचा आग्रह करत अभाविप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. हॉटेलच्या गेटला घेराव घालून कायदामंत्री मधुस्वामी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांना थांबविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना विरोध करण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. युके 27 हॉटेलमध्ये थांबलेल्या मंत्रिमहोदयांनी विद्यार्थ्यांना भेटीसाठी वेळ दिला नसल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा संताप व्यक्त केला. यामुळे अभाविपच्या वतीने बुधवारी पुन्हा बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यभरात मधुस्वामी यांच्याविरोधात आवाज उठविण्यात येत आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही परीक्षेच्या विरोधात नाही. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात यासंदर्भात ठरविण्यात यावे. यावेळी वाढता विरोध लक्षात घेऊन अभाविप कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची दुसरीकडे रवानगी करण्यात आली.
Check Also
मराठा लाईट इन्फंन्ट्रीमध्ये अग्नीवीरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात….
Spread the love बेळगाव : 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 651 अग्नीवीर जवानांचा शानदार …