
बेळगाव : बेळगावची होतकरू जलतरणपटू अनुमती चौगुले हिने चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2023 मध्ये दोन सुवर्णांसह 6 पदके पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे.
अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा एसआरएम युनिव्हर्सिटी चेन्नई येथे नुकतीच पार पडली. सदर स्पर्धेत बेंगलोरच्या जैन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना अनुमती चौगुले हिने दोन सुवर्ण पदकांसह प्रत्येकी दोन रौप्य व कांस्य पदके हस्तगत केली. बेळगावमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करणारी अनुमती सध्या बेंगलोरमध्ये शिकत आहे. बेंगलोरच्या बसवनगुडी येथील बसवनगुडी एक्वेटिक सेंटर (बीएसी) येथे पोहण्याचा सराव करणाऱ्या अनुमती चौगुले हिला जलतरण प्रशिक्षक नटराज व्ही. यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta