बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने आज सिल्व्हर ओक येथे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि खासदार शरद पवार यांची भेट घेतली. सीमाभागात कर्नाटक शासनाकडून मराठी बांधवावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेनंतर आक्रोश व्यक्त करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकात जमलेल्या मराठी तरुणांवर बेळगावच्या विविध पोलीस ठाण्यात गंभीर खोटे गुन्हे दाखल केले आहेत
तसेच देशद्रोह असा गंभीर गुन्हा कानडी संघटनांच्या दबावाखाली येऊन घालण्याचा विचार कर्नाटक सरकारने चालविला आहे. या प्रकरणी आपण लक्ष घालून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मराठी बांधवावर होत असलेली दडपशाही थांबवून मराठी तरुणावर घातलेले गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी युवा समितीच्या वतीने शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta