
बेळगाव : येथील विश्व भारती कला क्रीडा संघटनेतर्फे उद्योजक कुस्ती आश्रयदाते दानशूर नेतृत्व गोविंद टक्केकर व समाजसेविका अंजली पाटील यांचा सन्मान सिद्धार्थ बोर्डिंग शहापूर येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी उपस्थित होते.
प्रास्ताविक वाय. पी. नाईक यांनी केले. मान्यंवरांचे स्वागत दामोदर कणबरकर यांनी गुलाब पुष्प देऊन केले.
बेळगाव भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर नावलौकिक खेळाडूनी प्राप्त करावा. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे. खेळातून आपलं भविष्य उज्ज्वल करता येते. गावागावातून अत्याधुनिक तालीम आखाडे तालमी होणं गरजेचं आहे. युवकांनी खेळांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन उद्योजक गोविंद टक्केकर यांनी केले
यावेळी विश्व भारती कला क्रीडा संघटनेतर्फे वाय. पी. नाईक, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, मध्यवर्ती कुस्तीगिर संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरतन पवार, हिरालाल चव्हाण यांचाही शाल, सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला
कुस्तीपटू अक्षय व पार्थ पाटील यांना गौरव पत्र, शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रवींद्र बिर्जे, मोहन कुंभार, विनोद गुरव, पुंडलिक कुराडे, शिवानंद हिरेमठ, विठ्ठल देसाई, महादेव पाटील, गणपती देसाई,
अभय पाटील, अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
बेकवाड कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांचाही गौरव केला. शेवटी आभार अनिल देसाई यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta