
बेळगाव : शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाची प्रगती साध्य करता येते मात्र शिक्षणाबरोबरच जीवनात संस्कारांचे महत्त्व मोठे आहे याचे महत्त्व पालकांनी जाणून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीराम बिल्डर्स संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी केले.
शहापूर कचेरी गल्ली येथील सनशाईन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडले. नेताजी सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाला गोविंद टक्केकर, महादेवी नागरहळी, पत्रकार श्रीकांत काकतीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी अतिथींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी यावेळी सुंदर गीते सादर केले त्याचबरोबर धमाल नृत्यांनी पालकांची मनेही जिंकली.
शाळेच्या मुख्य कार्यवाह ज्योती शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. शाळेच्या शिक्षिका चंदा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta