Thursday , March 5 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाजाने लग्नाचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करत वेळेत लग्न लावावे. त्याचप्रमाणे हल्ली दोन दोन वेळा अक्षतारोपण करण्याची नवी प्रथा मराठा समाजामध्ये पडली आहे. त्यामुळे मराठा समाजाबद्दल चुकीचा संदेश इतर समाजात पसरत आहे. मुहूर्तावर आणि एकदाच वधू-वरांचे लग्न लावण्याची जबाबदारी वधूवरांच्या पालकांनी घ्यावी, असे मत मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर समाजातील वाढते घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी नवदांपत्याने तडजोडीची भूमिका घ्यावी असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा मंदिर येथे वधू-वर महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रकाश मरगाळे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शितल वेसणे, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, वधू-वर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे व खजिनदार के. एल. मजूकर उपस्थित होते.
प्रारंभी जी. जी. कानडीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रमुख पाहुणे शितल वेसणे त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वधू-वर मंडळाचे सदस्य ईश्वर लगाडे, मोहन सप्रे, संग्राम गोडसे, राजू पावले, कविता देसाई यांना गौरविण्यात आले तर ईश्वर लगाडे यांनी वधू-वर मंडळाचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन के. एल. मजुकर यांनी केले.
यावेळी कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, धारवाड, बेंगलोर येथून वधू-वर पालक उपस्थित होते.
मेळावा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय जाधव, अशोक अंकले, प्रकाश गडकरी, रघुनाथ बांडगी, विनोद आंबेवाडीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *