बेळगाव : शहर समितीच्या विस्तारामुळे सीमालढ्याला बळकटी मिळणार असून नवीन युवा कार्यकर्ते लढ्यासोबत जोडले जात आहेत. त्यामुळे समितीला बळकटी प्राप्त होत आहे, असे विचार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन कार्यकारिणीची बैठक शनिवारी मराठा मंदिर येथे पार पडली. महादेव पाटील यांनी प्रास्तविकात, सीमालढ्यात अनेक चढ-उतार आले असले तरीही प्रदीर्घ काळ लढा सुरू आहे. सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात आहे. त्याला बळ देण्यासाठी विस्तारित कार्यकारिणी करा, अशी मागणी होत होती. त्यानुसार कार्यकर्त्यांची मते जाणून नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली आहे. त्यामधून पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार असल्याचे सांगितले.
गुणवंत पाटील म्हणाले, रचनात्मक पद्धतीने कार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांवर जबाबदारी देऊन जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समितीमध्ये प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.
नूतन कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील म्हणाले, समितीच्या ध्येय-धोरणाशी बांधील राहून ताकद वाढवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन कार्य केले जाईल. येणाऱ्या काळात युवा कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
त्यामुळे प्रत्येक प्रभागात समितीची फळी निर्माण व्हावी आणि मराठी भाषिकांची ताकद वाढावी, यासाठी कार्यरत रहावे.
समिती नेते रमाकांत कोंडूसकर, सतीश पाटील, दत्ता जाधव, रमेश पावले, प्रशांत भातकांडे, धनंजय पाटील, अभय कदम, सुनील देसुरकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, सागर पाटील, शंकर बाबली, आदींनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला राकेश पलंगे, विकास कलघटगी, कपील भोसले, संजय जाधव, अजित कोकणे, अभिजीत मजुकर, बाळु केरवाडकर, श्रीधर खन्नूकर, बाबू कोले, अनिल अमरोळे, शिवराज पाटील, प्रमोद गावडोजी, बळवंत शिंदोळकर, सुनील बोकडे, राजकुमार बोकडे, विराज मुरकुंबी, अजित कोकणे, सुधाकर चाळके, उदय पाटील, उमेश पाटील, किरण हुद्दार, सुनील देसूरकर, किरण धामणेकर, धनजंय पाटील, शिवराज पाटील, रमेश माळवी, मोहन पाटील, संजय शिंदे, अशोक जाधव, विलास लाड, विजय हलगेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.