बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सीमा प्रदेशातील 865 खेड्यातील नागरिकांना विविध रोगावर उपचार करून घेण्यासाठी मदत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून श्री. सुनील लक्ष्मण कुरणकर आळवण गल्ली शहापूर बेळगाव यांना हृदय रोगावरील उपचारासाठी एक लाख रुपयांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने अर्थसहाय मंजूर करण्यात आले आहे. सदर रक्कम श्री. कुरणकर यांच्यावर उपचार करणाऱ्या अरिहंत हॉस्पिटल बेळगाव यांच्या बँक ऑफ बडोदा मधील खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. आज कुरणकर कुटुंबीयांच्या वतीने व शहापूर मधील कार्यकर्त्यांच्या वतीने अर्थ सहाय्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने प्राचार्य आनंद आपटेकर यांनी सर्वांचे स्वागत करून या योजनेची माहिती दिली. श्री. अनिल अमरोळे यांनी नागरिकांच्या वतीने समितीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर श्री. रमाकांत कोंडुसकर, श्री. राजाराम मजुकर, श्री. बाबू कोले, श्री. श्रीधर खन्नूकर. श्री. बाळू कुरणे, श्री. शशिकांत पाष्टे, श्री. सुनील बोकडे, श्री. जयवंत कातीकर, सौ. प्रियांका कुरणकर, समर्थ सुनील कुरणकर इत्यादी उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई, चंदगडचे भाजपा अध्यक्ष श्री. शिवाजीराव पाटील आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कार्य समर्थपणे पाहणारे श्री. मंगेश चिवटे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक म्हणून प्राचार्य आनंद आपटेकर 9880131123 यांना सविस्तर माहितीसाठी नागरिकांनी संपर्क करावा.