Sunday , September 20 2026
Breaking News

जवाहर तलाव परिसरात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून जनतेच्या माध्यमातून निपाणी जवाहर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यंदा सहाव्या वर्षी ही स्वच्छता मोहीम रविवारी (ता.१९) सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आली. प्रत्येक रविवारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या रविवारी सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली ओढा परिसरातील टाकाऊ वस्तु, प्लास्टिक व कचरा एकत्रित करून जाळण्यात आला.
सध्या शिरगुप्पी ओढ्यातून येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर अनेक काटेरी झाडे झुडपे वाढले आहेत. शिवाय काही नागरिकांनी ओढ्यात टाकाऊ वस्तु टाकल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी तलावात येण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे तलाव परिसर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. सकाळी आठ ते दहा अशी दोन तास ही मोहीम राबविण्यात आली. पुढील रविवारी शहर व उपनगरातील नागरिकांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन लोकरे केले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *