बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आज स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती त्याच बरोबर स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी म. ए. युवा समितीच्या पदाधिकार्यांनी म. ए. युवा समितीच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यावेळी म. ए. युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम म्हणाले की, आपले सहकारी आज तुरुंगात असताना आपण कोठेही आपल्या कार्यात कमी पडणार नाही आणि आम्हाला जे संयुक्त महाराष्ट्राचे ध्येय गाठायचे आहेत त्या ध्येयास राजमाता जिजाऊ मां साहेबांकडून आम्हास शक्ती आणि ऊर्जा आम्हास मिळू दे. तसेच कोणतेही कार्य अडथळ्यांवाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यशाची प्राप्ती होते हे विवेकानंदाचे विचार आम्हाला आमचे ध्येय गाठण्यास प्रेरणा देतील, अनेक अडथळे आमच्यावर येत राहतील त्यांचा आम्ही जिद्दीने सामना करू आणि आपले ध्येय नक्कीच गाठू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, विनायक कावळे, सिद्धार्थ चौगुले, जोतिबा पाटील, ओंकार पाटील आदी म. ए. युवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta