बेळगाव : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवणाऱ्या चोरट्याला पकडण्यात शहापूर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी चोरट्याकडून तब्बल साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत.
प्रज्वल जयपाल खानजी (वय २८) राहणार बस्तवाड रोड धामणे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याकडून १०३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि चोरी करण्यास वापरण्यात येणारी दुचाकी असे मिळून साडेसात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जत करण्यात आला आहे.
संशयित आरोपीने चोरी केलेले दागिने फायनान्सच्या लॉकरमध्ये ठेवले होते. संशयित आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील शहापूर, टिळकवाडी आणि उद्यमबाग पोलीस स्थानक व्याप्तीतील अनेक महिलांच्या गळ्यातील हार लंपास केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे. शहापूर पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी आधी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
प्रज्वल हा शहापूर परिसरात चोरीच्या प्रयत्नात असताना संशयास्पदरित्या वावरताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
पोलीस आयुक्त याडा मार्टिन, उपायुक्त पी व्ही स्नेहा, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta