बेळगाव : बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र आणि पक्षाचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना बेंगळुरू येथे झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आली. मुडा घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी म्हैसूर येथे आयोजित केलेल्या विशाल निषेध रॅलीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केल्याचा निषेध व्यक्त करून बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी टायर पेटवून राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे, इरय्या खोत, मुरगेंद्र गौडा पाटील, जिल्हा माध्यम प्रमुख सचिन काडी, जिल्हा सोशल मीडिया समन्वयक संतोष देशनूर, विजय कोडगनूर, सिद्धू पाटील, प्रसाद देवरमणी विठ्ठल सायन्नवर, संजयकुमार नवलगुंद व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta