बेळगाव (वार्ता) : शहापूर येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 19 मध्ये आज बुधवारी सकाळी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार श्रीकांत काकतीकर आणि जाएंट्स ग्रुप बेळगाव परिवार अध्यक्ष श्रीधर मुळीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभ, महात्मा गांधी, भारत माता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाएंट्स ग्रुप बेळगाव परिवार त्याच बरोबर श्रीरंग स्वीट मार्ट, संगीता स्वीट मार्ट, समृद्धी संस्था यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मिठाई आणि अल्पोपहार वाटप करण्यात आले. जाएंट्स ग्रुप बेळगाव परिवारच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या भेटवस्तू स्वरूपात देण्यात आल्या. बंडू पाटील यांनी शाळेला दहा खुर्च्यांची भेट दिली.
जाएंट्स फेडरेशनचे राजू माळवदे, तानाजी शिंदे, प्रवीण त्रिवेदी, अजित तडकोडे, महेश अंबरोळे, श्रीधर भस्मे, विनायक किल्लेकर, प्रभाकर पाटील, देवेंद्र पाटील, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष माधुरी सुंडीकर, सदस्य प्रभाकर पाटील व अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एम. के. कडंगळे यांनी प्रास्ताविक केले. तर शिक्षिका श्रीमती एम. एम. खन्नुकर यांनी आभार व्यक्त केले.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …