Thursday , March 5 2026
Breaking News

विद्याभारती क्षेत्रीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेला रविवार दि. 22 रोजी प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, मल्लखांब प्रमुख अनुराधा पुरी, मल्लखांब प्रशिक्षक सुरज देसुरकर, मयुरी पिंगट, चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील या मान्यवरांचे हस्ते मलखांब पोलचे पुष्पर घालून व श्रीफळ वाढून किरण जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

याप्रसंगी किरण जाधव म्हणाले की, पारंपरिक भारतीय खेळाचे पुन्हा पुनर्जीवन होत आहे ही सर्व भारतीयांना एक समाधानकारक बाबा असून भारतीय खेळांना पुन्हा नव्या पिढीसमोर आदर्श घालण्याचे काम विद्याभारती व संत मीरा शाळेने पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन केले तसेच या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मलखांब पंच संकेत पाटील, स्वप्निल पाटील, प्रफुल्ल पाटील, श्री. चौगुले, किरण पावसकर,शामल दड्डीकर, धनश्री सावंत, बापूसाहेब देसाई, जयसिंग धनाजी, शाळेच्या मुख्यमंत्री आलिना पठाण, साईकिरण शिंदे, गणेश माळवी, सान्वी पाटील, यश पाटील, शिवकुमार सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
या क्षेत्रीय स्पर्धेत कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक मुला- मुलींच्या संघाचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *