बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा बाल शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक वाय. सी. गोरल सर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून युनियन बँक येळ्ळूरचे शाखाप्रमुख अभिजीत सायमोते हे उपस्थित होते. प्रारंभी सर्व संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली. व्हा. चेअरमन श्री. सतीश पाटील यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. सोसायटीचे चेअरमन राजू पाटील यांनी सोसायटीचा विस्तार करण्याची त्यांची दृष्टी आणि तळमळ व्यक्त केली व सोसायटीला एकूण 9,02,736 रुपये नफा झाल्याची आणि सोसायटीच्या वतीने सर्व भागधारकांना 10% लाभांशांची घोषणा केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सोसायटीच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे अभिजीत सायमोते यांनी सहकार क्षेत्र आणि बँकिंग या विषयावर मार्गदर्शन केले.
व्यवस्थापिका लक्ष्मी पाटील यांनी मागील सभेतील ठरावांचे वाचन केले. संचालक बबन कुगजी यांनी नफा तोटा पत्रकाचे, संचालक जोतिबा बेडरे यांनी ताळेबंद वाचन केले. 2024-25 आर्थिक सालाच्या अंदाजपत्रकाचे वाचन संचालक राघवेंद्र सुतार यांनी केले व ज्येष्ठ संचालक प्रदीप मेणसे यांनी नफा विभागणी पत्रकाचे वाचन केले तर महेश पाटील यांनी संस्थेच्या मागील 5 वर्षाचा अंतरिम अहवाल मांडला. परशुराम मंगणाईक यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना व मार्च 2023 सालच्या दहावी परीक्षेत गावातील प्रत्येक हायस्कूल मधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्याना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सन 2023-24 सालाकरीता संस्थेसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संचालक बबन कृष्णा कुगजी यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. सदर कार्यक्रमाला सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सल्लागार, मार्गदर्शक, भागधारक, हितचिंतक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश जाधव आणि चेतन हुंदरे यांनी केले तर सी. एन. कर्लेकर यांनी आभार मानले