संगोळी रायण्णा मिलिटरी स्कूलच्या मंजुरीचे निवेदन
नवी दिल्ली : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन राज्याच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी संगोळी येथे १८९ कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास येत असलेली शाळा मिलिटरी स्कूलला परवानगी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
सैनिक स्कूल सोसायटीचे अधिकारी आणि बेळगाव जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यापूर्वीच घटनास्थळाची पाहणी केली आहे. सैनिकी शाळेचा दर्जा राखण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सैनिक स्कूल सोसायटीला मान्यता देण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.