बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्यास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी बेळगावात कन्नड समर्थक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले.
बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याला परवानगी मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, कोणत्याही कारणास्तव समितीला महामेळाव्यासाठी परवानगी देऊ नये, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना कन्नड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना आंदोलक वाजिद हिरेकुडी म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही कारणास्तव म. ए. समितीला महामेळावा आयोजित करण्यास परवानगी देऊ नये. महामेळावा आयोजित केल्यास बेंगळुरूहून लोकांना बोलावून बेळगावात संघर्ष केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
अधिवेशनाविरोधात महामेळावा आयोजित करणाऱ्या समिती नेत्यांना हद्दपार करावे उपरोक्त मागणीचे निवेदन कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.