Tuesday , September 17 2024
Breaking News

कॉंग्रेसचे आता विधानसभेत ‘दिवस-रात्र’ आंदोलन

Spread the love

ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी कायम; विधान परिषदेतही पडसाद

बंगळूर : राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शनेने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत सुरूच राहीली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज आजही ठप्प झाले. त्यामुळे सभाध्यक्षानी उद्या सकाळी ११ पर्यंत विधानसभेचे कामकाज स्थगीत केले. राष्ट्रध्वजाच्या कथीत अवमानाचे पडसाद विधान परिषदेतही दिसून आले.
काँग्रेसने या प्रश्नाला “तार्किक अंत” देण्यासाठी ‘दिवस-रात्र’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, तर ईश्वरप्पा यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही कारणास्तव मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेला मी देशभक्त आहे, असे ईश्वरप्पा म्हणाले.
त्यांना आंदोलन करू द्या, मी डगमगणार नाही, असे सांगत त्यांनी कॉंग्रेस पक्षाने निषेधासाठी राष्ट्रध्वजाचा ‘दुरुपयोग’ केल्याचा त्यांनी आरोप केला व राज्य काँग्रेसचे प्रमुख या नात्याने डी. के. शिवकुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.
अलीकडेच ईश्वरप्पा यांनी दावा केला होता, की भविष्यात कधीतरी ‘भगवा ध्वज’ राष्ट्रध्वज बनू शकतो आणि तोच लाल किल्ल्यावर फडकवला जाऊ शकतो.
मात्र, तिरंगा हाच आता राष्ट्रध्वज आहे आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले होते.
आज सभागृहाची बैठक सुरू होताच काँग्रेसचे सदस्य त्यांच्या निषेधार्थ वेलमध्ये उतरले. १४ फेब्रुवारी रोजी निधन झालेल्या माजी आमदार मल्लूर आनंदराव यांना सभागृहाने श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला आणि काँग्रेस सदस्यांनी ईश्वरप्पा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि त्यांना “देश द्रोही” म्हटले.
सभापतींनी वारंवार विनंती करूनही त्यात सहभागी न झालेल्या काँग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीतच प्रश्नोत्तराचा तास झाला.
आम्हाला न्याय हवा आहे”, “आम्हाला राजीनामा हवा आहे”, “भ्रष्ट सरकार खाली करा”, “ईश्वरप्पा- देशा द्रोही”, “हे सरकार आरएसएसचे कठपुतळी आहे”, “भाजप सरकार राष्ट्रध्वजविरोधी आहे” – यासारख्या सततच्या घोषणामुळे सभागृहाची कार्यवाही बिघडली.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभापतींनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलण्यास सांगितले, परंतु ते बोलले नाहीत आणि काँग्रेस आमदारांसह वेलमधून निषेध करत राहिले.
गोंधळ सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब केले.
विधानसभेच्या अध्यक्षांनी ईश्वरप्पा यांच्या विरोधात बडतर्फीचा आणि देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी करणारा काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळला.
विधानपरिषदेतही पडसाद
विधानपरिषदेतही काँग्रेसने ईश्वरप्पा यांच्यावर कारवाईची मागणी करणारे फलक घेऊन काँग्रेसच्या निषेधार्थ कामकाज ठप्प झाले, सभापती बसवराज होराट्टी यांना सभागृहाचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यास भाग पाडले.
विधानसभेच्या बाहेर पत्रकारांना संबोधित करताना, भाजप आणि संघ परिवारावर राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याचा आरोप करत सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेसने या समस्येला तार्किक अंतापर्यंत नेण्यासाठी ‘दिवस-रात्र’ आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यपाल, जे घटनात्मक प्रमुख आहेत, त्यांनी हस्तक्षेप करून ईश्वरप्पा यांना बडतर्फ करण्याच्या सूचना द्यायला हव्या होत्या, कारण त्यांची ही टिप्पणी देशद्रोहाची आहे, असे नमूद करून ते म्हणाले, “मुख्यमंत्रीही ईश्वरप्पा यांच्यावर कारवाई करत नाहीत, आरएसएस ईश्वरप्पा यांच्या माध्यमातून आपला छुपा अजेंडा राबवत आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *