बेळगाव : येथील प्रसिद्ध बेळगावी श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी माजी चेअरमन श्री. रमेश महारुद्रप्पा कळसन्नावर आणि उपाध्यक्षपदी नूतन संचालक सतीश कलगौडा पाटील यांची निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी जबिउल्लाह के. यांच्या उपस्थितीत शनिवारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड झाली. सहकारी खात्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री. समीर मीराजकार हेही उपस्थित होत्या. यावेळी बँकेचे संचालक श्री. बी. बी. कग्गनगी, श्री. व्ही. सी. अंगडी आणि श्री. पी. एम. बाळेकुंद्री. श्री. आर. एस. सिद्धनवर. श्री. बी.व्ही. झोंड, श्री. बी. व्ही. उप्पिन, श्रीमती एस. एस. हेरेकार, श्री. जी. व्ही. बागी, श्री. बी. व्ही. वाकणे. श्री. जे.एस. खडबडी, श्रीमती पी. ए. हुक्केरी, श्री. सी.एच. कट्टीमणी, श्री. आर. बी. कालेनट्टी आणि महाव्यवस्थापक श्री. एस. एस. वाली आणि कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांनी संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम पारदर्शकरित्या करण्याचे आश्वासन दिले. शेवटी महाव्यवस्थापक श्री. एस. एस. वाली यांच्या आभार प्रदर्शनाने निवडणूक प्रक्रिया संपली.
Belgaum Varta Belgaum Varta