परम पूज्य जगद्गुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी
बेळगाव : मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि गुरुकुल निर्मितीसाठी आवश्यक विचारमंथन करण्याच्या उद्देशाने राज्य क्षत्रिय मराठा समाज जागृती महासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सोहळा रविवार, 30 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 4:00 वाजता, मराठा विद्या प्रसार मंडळाच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात (राम जाधव मार्ग, सौंदती रोड, धारवाड) संपन्न होणार आहे.
गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर समाजाच्या एकसंधतेचा व प्रगतीचा निर्धार करण्यासाठी समाजबांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सोहळ्यास परम पूज्य जगद्गुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्याचा लाभ होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक सरकारचे मंत्री माननीय श्री संतोष लाड यांच्या हस्ते होईल, तर मराठा विद्या प्रसार मंडळ, धारवाडचे अध्यक्ष माननीय श्री. मनोहर मोरे हे अध्यक्षपद भूषवणार आहेत. माननीय श्री पी. जी. आर. सिंधिया – माजी गृहमंत्री, कर्नाटक सरकार, श्री श्रीमंत पाटील – माजी मंत्री, श्री. प्रकाश पागोजी – व्यवस्थापक, संचालक, मराठा समुदाय अभिवृद्धी निगम, आमदार श्री. श्रीनिवास माने, एमएलसी श्री. एम. जी. मूळे, आमदार श्री. विठ्ठल हलगेकर – आमदार, खानापूर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, श्री. सुरेशराव साठे – राज्याध्यक्ष, के.के.एम.पी., श्री मनोज कुमार रण्णोरे – अध्यक्ष, के.एम.डब्ल्यू.ए., श्रीमती रुपाली नाईक – माजी आमदार, कारवार, श्री. अनिल बेनके – माजी आमदार, बेळगाव-आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण चर्चा
या महासभेत मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी नव्या योजनांची घोषणा केली जाणार आहे. विशेषतः गुरुकुल निर्मिती आणि युवा पिढीच्या सशक्त भविष्यासाठी आवश्यक उपक्रमांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन या विषयांवर विचार करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.