बेळगाव : सालाबादप्रमाणे परंपरेनुसार कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा डोंगरावरील चैत्र पौर्णिमेची यात्रा आटोपून जोतिबाच्या नावानं चांगभलं, काळभैरवाच्या नावानं चांगभलं अशा जयघोषात चव्हाट गल्ली येथील श्री देवदादा सासनकाठी आज गुरुवारी पुनश्च बेळगावमध्ये दाखल झाली. त्यानिमित्त शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
आगमन होताच प्रथेनुसार चैत्र पौर्णिमेनिमित्त शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये देवाची पूजा करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरा आवारामध्ये आज गुरुवारी दुपारी आयोजित या महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचा बेळगाव शहर परिसरात हजारो भक्तांनी लाभ घेतला. देवदर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta