Saturday , December 13 2025
Breaking News

कौशल्याधारित शिक्षणाद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे : कुलगुरू प्रो. सी. एम. त्यागराज

Spread the love

 

शिवानंद महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

कागवाड : विकसित भारत @ २०४७ साध्य करण्यासाठी ऐतिहासिक आणि आर्थिक प्रयत्न परंतु ग्रामीण स्तरावर शिक्षण घेतलेल्या आणि शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देणे हे आपल्या अध्यापन अभ्यासक्रमाचे मोठे ध्येय आहे. कौशल्याधारित शिक्षणाद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. आजच्या काळात ग्रामीण भागात धर्म आणि मूल्यांचा ऱ्हास होत असून, सामाजिक, धार्मिक आर्थिक विकासाबरोबरच सेवा क्षेत्रातही बदल व्हायला हवेत असे प्रतिपादन राणी चन्नमा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सी. एम. त्यागराज यांनी केले.
येथील शिवानंद महाविद्यालयात अर्थशास्त्र, इतिहास, शिक्षणशास्त्र विभाग आणि इतिहास संशोधन परिषद, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारत @२०४७’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू प्रो. सी एम त्यागराज हे चर्चासत्राचे उदघाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस ए करकी होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रा.बी.ए. पाटील, व्यवस्थापक प्रा. व्ही. एस. तुगशेट्टी, प्रा. बी. डी. दामन्नावर, प्रा. पी.एस. पट्टणशेट्टी उपस्थित होते.
प्रारंभी कु.सानिका जाधव हिने प्रार्थना सादर केली. कार्यक्रम समितीचे सचिव डॉ.चंद्रशेखर वाय यांनी स्वागत केले. या परिसंवादात सादर झालेल्या शोधनिबंधांच्या निमित्ताने ‘संशोधन’ खंड-1′ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बीजभाषक म्हणून उपस्थित असलेल्या बेळगावच्या निवृत्त इतिहास प्राध्यापिका डॉ.मीना मोहिते आणि सांगलीच्या वेलिंग्डन कॉलेजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोहर ए कोरे यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ.मीना मोहिते यांनी २०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत असून महात्मा गांधींनी शतकानुशतके सांगितले आहे की भारताचे भविष्य त्यांच्या खेड्यांमध्ये आहे. भारतातील गावे ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी विकसित होण्यासाठी भरपूर वाव आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर वाढ न झालेल्या विविध उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा व्यापक अभ्यास केला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
डॉ. मनोहर ए कोरे म्हणाले की, कॉर्पोरेट जगतातील मेक-इन इंडिया उपक्रम ग्रामीण भारताकडे वळवण्यासाठी धोरण आखणे आवश्यक आहे. या संदर्भात, विकसित भारत@ २०४७ ची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहे. अर्थव्यवस्था मजबूत असेल तर सामाजिक सुधारणा पुरेशा प्रमाणात आणता येतील.
प्रमुख उपस्थिती असलेले सातारा संशोधन परिषदेचे सचिव डॉ.जयपाल सावंत म्हणाले की, महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य भागात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा संमेलनाचे आयोजन करून आनंद निर्माण झाला असून यापुढील काळातही असेच सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित राहून शोधनिबंध सादर केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रा. एस एस फडतरे आणि प्रा एस एम परगौडा यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.जे.के. पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *