Thursday , April 23 2026
Breaking News

बेळगाव डीसीसी बँकेला 33 कोटी 11 लाख रुपयांचा नफा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव डीसीसी बँकने या वर्षी एकूण 33 कोटी 11 लाख रुपयांचा नफा मिळवला असून, बँकेच्या कार्यकाळात विविध योजनांचा फायदाही प्राप्त झाला आहे, अशी माहिती बँकेचे संचालक भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली.
आज बोलाविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदर माहिती देण्यात आली. बेळगाव डीसीसी बँकेने या 5 महिन्यांच्या कार्यकाळात 9 नवीन शाखा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय, साखर कारखान्यांकडून वसुल केलेली 162 कोटी कर्ज व 192 कोटी रुपये व्याज देखील यशस्वीरीत्या वसूल झाली आहे, अशी माहिती भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, या वर्षीच्या 5 महिन्यांत बँकेला 3 कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा मिळाला असून, या नफ्यामुळे 12 महिन्यांच्या कालावधीत बँकेला 50 कोटी रुपयांचा नफा होईल. बँकेचे खर्च कमी करून, त्यांनी उधळपट्टी थांबवली आहे. आगामी शतक महोत्सवासाठी बँकेने सर्व शाखा विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

बँकेचे संचालक अण्णासाहेब जोल्ले बोलताना म्हणाले, सरकारच्या शून्य व्याज दर योजने अंतर्गत 3175 कोटी रुपये अल्पावधीत वितरित करण्याचे लक्ष्य होते. मात्र, या योजनेच्या माध्यमातून 4 लाख 88 हजार 379 शेतकरी सदस्यांना 3475 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. तसेच, नवीन शेतकऱ्यांना 15 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. निश्चित पेंशन साठी 500 निवृत्त कर्मचारी आणि 2500 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना पेंशन देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, सर्व सक्रिय कर्मचार्‍यांसाठी पेंशन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगुडे आणि संचालक महांतेश दोड्डगौडर यांनी बँकेच्या आधुनिक योजनांबद्दल माहिती दिली. स्वसहाय्य गटांना वितरित केलेले कर्ज, कर्ज पुनर्भरण आणि कर्मचार्‍यांना देण्यात आलेली विविध सोयी यासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आली. या बैठकीत संचालक व इतर सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतन शाळेचा गौरव

Spread the love  बेळगाव : ‘मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी’ या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रीटिंग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *