बेळगाव : बेळगावच्या सर्वलोक फौंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ यांनी हायवे शेजारी पडलेल्या भग्न प्रतिमांचे संकलन करत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे. दोनच दिवसांपूर्वी रस्त्यावर अपघात मयत झालेल्या श्वानांचे विधिवत अंतिम संस्कार करून प्राणीदया दाखविलेल्या सर्वलोक फौंडेशनने रस्त्या शेजारी पडलेल्या देवीदेवतांच्या प्रतिमांचे संकलन करून सामाजिक बांधिलकी दाखवली आहे.
रविवारी होनगा NH 4 हायवे ता. जि. बेळगाव परिसरात हिंदू देवदेवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमा अस्तव्यस्त अवस्थेत पडलेल्या होत्या. हायवे शेजारील रस्त्या बाजू व्यतिरिक्त NH4 हायवे पासिंग ब्रीजखाली देखील भग्न प्रतिमा पडलेल्या होत्या याची माहिती बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते तथा सर्वलोक सेवा फौंडेशन बेळगावचे अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ यांना मिळाली.
हिरेमठ त्यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी भेट दिली व भग्न झालेल्या सर्व प्रतिमांचे तसेच संकलन केले तसेच पुन्हा अशा ठिकाणी आपल्या देवदेवतांच्या प्रतिमा नागरिकांनी टाकू नये असे आवाहन केले.
संकलन केलेल्या प्रतिमांचे विधिवत दहन करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच होनगा गावचे प्रथम नागरिक ग्राम पंचायत अध्यक्ष विजय होनमनी यांनी देखील यापुढे अशा प्रकारच्या भग्न प्रतिमा असतील तर नागरिकांनी ग्रामपंचयात कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा सर्व लोकसेवा फौंडेशनशी संपर्क करावा, परंतु अशा भग्न अवस्थेत प्रतिमा कुठेही नागरिकांनी टाकू नये व आपल्या देवदेवतांचे विटंबन थांबवावे असे आवाहन केले.
विरेश बसय्या हिरेमठ अध्यक्ष सर्व लोक सेवा फौंडेशन बेळगाव यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सोबत रुपेश चौगले, देवाप्पा कांबळे, बाळू कणबरकर तसेच होनगा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta