Tuesday , December 9 2025
Breaking News

चित्ररथ मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंदी; आयुक्तांचे आदेश

Spread the love

बेळगाव : छत्रपती शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणुकीत बेळगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. १ मे रोजी सकाळी १०.३० ते २ मे सायंकाळी ६ वाजेपर्यंत दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

दारू दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये दारू विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. दारूची दुकाने आणि केएसबीसीएल डेपो, हॉटेलमधील बॅगर्स बंद करण्यात यावेत आणि सर्व अबकारी परवानाधारक दुकाने बंद करून सील करण्यात यावेत.
बेळगाव तालुक्यात सर्वत्र सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने हा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी व बेळगाव शहर पोलीस आयुक्त यांनी एका निवेदनात नमूद केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *