
बेळगाव : पोलीस खात्यामध्ये विविध पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून त्यांना गौरव पदके जाहीर करण्यात आली आहे.शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना ही पदके जाहीर झाली आहेत. सीईएन विभागाचे सीपीआय बी.आर. गड्डेकर, एएससी श्रुती आणि श्रीशैल बलीगार यांना डीजी आणि आयजीपी पदके प्रदान करण्यात आली आहेत.
शहरातील दोन अधिकाऱ्यांना पदके मिळाल्याने ही बाब बेळगावातील पोलीस खात्याला अभिमानास्पद ठरली आहे. हे पदक २०२४-२५ च्या सेवेचा विचार करून देण्यात आले आहे आणि या पोलिस अधिकाऱ्यांना २१ मे रोजी बेंगळुरू येथे पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
जिल्हा पोलिस विभागात, जिल्हा पोलिस विभागातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रुती आणि श्रीशैल बालीगर यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta