बेळगाव : कर्नाटक वीज प्रसारण निगम लिमिटेड (केपीटीसीएल) च्या वतीने 110 के.व्ही. वडगाव उपकेंद्रामध्ये चौथ्या त्रैमासिक व आपत्कालीन देखभालीची कामे हाती घेण्यात येत असल्याने उद्या रविवार दिनांक 18 मे रोजी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
सकाळी 9.00 वाजेपासून संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत वडगाव उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा होणाऱ्या धामणे, कुरबरहट्टी, मासगोनहट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर-सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी, कोंडसकोप्प, हलगा आणि बस्तवाड या गावांमध्ये तसेच या गावांतील सिंचन पंपसेट क्षेत्रांमध्ये वीजपुरवठा खंडित राहील, असे कर्नाटक वीज प्रसारण निगम लिमिटेडच्या ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता (वि) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.