बेळगाव : सोशल मीडियावर कुराणबद्दल अपमानास्पद टिपणी केल्याच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिस ठाण्याला हजारो मुस्लिम तरुणांनी घेराव घातला. व त्यांच्या अटकेची मागणी करत निदर्शने केली. आरोपीला अटक होईपर्यंत येथून हलणार नाहीत असा मुस्लिम तरुणांचा आग्रह होता.
दरम्यान, डीसीपी रोहन जगदीश यांनी शहापूर पोलिस ठाण्यास भेट देऊन निदर्शने करणाऱ्या मुस्लिम तरुणांची समजूत काढली. आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुस्लिम तरुणांनी आंदोलन मागे घेतले.