बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागातील कंग्राळी बुद्रुक गावात प्यास फाऊंडेशन आणि जिनाबकुल फोर्ज यांच्या संयुक्त प्रयत्नातून एका जुन्या विहिरीचे यशस्वी पुनरुज्जीवन करण्यात आले आणि ती ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली.
या कार्यक्रमात जिनाबकुल फोर्ज प्रायव्हेट लिमिटेडचे किरण जिनगौडा आणि संतोष केळगेरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्यासा फाऊंडेशनने गेल्या उन्हाळ्यात सुरू केलेल्या या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे कौतुक केले. या प्रकल्पात विहिरीला पंधरा फूट खोल करून पाण्याची पातळी वाढवण्यात आली, ज्यामुळे जलचर आणि गावकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.१३ मे रोजी झालेल्या एका समारंभात ही विहीर औपचारिकरित्या कंग्राळी ग्रामपंचायतीला सोपवण्यात आली. डॉ. माधव प्रभू यांनी या सहकार्याबद्दल आणि प्रयत्नांबद्दल प्रशंसा व्यक्त केली.ग्रामपंचायत अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, ग्रामविकास अधिकारी गोविंद रंगप्पगोळ आणि ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.