
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील मुसगुप्पी गावात पत्नीशी वाद झाल्याने भांडण करून घराबाहेर पडलेल्या पतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. महालिंग सीमेगोळ (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महालिंग हा बुधवारी गुजनाट्टी गावातून आपल्या पत्नीसोबत भांडून घरातून बाहेर पडला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह डोक्याला दुखापत झालेल्या अवस्थेत मुसगुप्पी गावात आढळून आला. विशेष म्हणजे, मृतदेहाशेजारी विषाची बाटलीही सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. मुडलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta