Monday , September 21 2026
Breaking News

सौंदत्ती येथे डोक्यात दगड घालून एकाची निर्घृण हत्या!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

सौंदत्ती शहरातील एपीएमसीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मृतदेहाशेजारी विटा आणि दगडही सापडले आहेत, ज्यामुळे हत्येचा संशय अधिक बळावला आहे. घटनेची माहिती मिळताच सौंदत्तीचे सीपीआय धर्मकर धर्मट्टी आणि पीएसआय के. एम. बन्नूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिसराची पाहणी केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही हत्या कोणी केली आणि त्यामागचे कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *