
बेळगाव : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनचे शास्त्रज्ञ डॉ. मनीष बरवालिया व त्यांचे सहकारी मीनल उत्तम देसाई, जे. डोड्डा बसवा व गौतम जोतिबा नागवडेकर यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. त्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती घेऊन याबाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुसज्ज ग्रंथालयाची, अत्याधुनिक उपकरणानी व वैज्ञानिक प्रयोगानी सज्ज असलेली प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांनी अभ्यासाशिवाय संशोधनामध्ये व खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी पाहून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व शाळेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच शाळेसाठी रुपये पंचवीस हजारांची देणगी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांच्याकडे सुपूर्द केली. व यापुढेही शाळेतील इतर उपक्रमांना मदत करण्याचा मानस व्यक्त केला. या देणगी बद्दल अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील हे उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta