
बेळगाव : शिवाजीनगर येथील साई मंदिर जवळ कुणाल राजेंद्र लोहार (वय 21) नामक तरुणावर काल दुपारी क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून दोन जण फरारी आहेत. हल्लेखोरांनी आपल्या अन्य दोन साथीदारांसह हल्ला करण्यापूर्वी जखमी कुणाला प्रथम दोरीने ओढून त्याच्या डोक्यावर लोखंडी वार केल्याचे समजते. तसेच त्यांच्या दुसऱ्या साथीदाराने केबल वायरने पाठीवर हल्ला केला. यावेळी एकूण सात जणांनी मिळून कुणाला गंभीररित्या जखमी केले. सदर घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नवर आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून अद्याप दोन जण बेपत्ता असल्याचे समजते. अटक केलेल्या आरोपींची नावे सुदर्शन रामा पाटील (वय 19 लक्ष्मी गल्ली), श्रीधर रायाप्पा होंडाई (वय 31, भिमराया हल्लाप्पा गुंजगी ( वय 23), सचिन भिमराया कातबळी (वय 21), प्रकाश संभाजी लोहार (वय 25), सर्वजण राहणार भूतरामहट्टी तर राकेश हुल्याप्पा बुडागा रा. वाल्मिकी गल्ली, मुत्यानट्टी, बेळगाव) अशी आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 160/2025 अंतर्गत भा.द.वि. कलम 189(2), 191(2), 191(3), 109, 118(1), 115 (2), 352, 351(3) आणि 190-2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे देखील जप्त केले असून त्यामध्ये एक रॉड, केबल वायर, एक पल्सर मोटरसायकल आणि गुन्ह्याशी संबंधित 80,000 रुपये रोख यांचा समावेश आहे. सध्या फरार असलेल्या उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta