
बेळगाव : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री बडेकोळमठ घाटजवळ गोगटे कंपनीची बस उलटून दोन जणांचा मृत्यू झाला.
हुबळीहून पुण्याला जाणारी गोगटे कंपनीची खासगी बस उलटली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. बसमधून एकूण १२ जण प्रवास करत होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला.
हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी बसमधून नऊ जणांना बाहेर काढले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात आले आणि त्यांना बेळगावच्या बिम्स रुग्णालयात हलवण्यात आले.
ही घटना हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta