बेळगाव : सुळेभावी (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवी देवस्थान आणि श्री क्षेत्र कलमेश्वर मंदिर परिसरात इतरत्र टाकण्यात आलेल्या देव-देवतांच्या भग्न प्रतिमा विधीवत दहन करण्यासाठी संकलित करण्याचा स्तुत्य उपक्रम सर्व लोकसेवा फाऊंडेशन बेळगावचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी आज आपल्या फाऊंडेशनतर्फे राबविला.
महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर असणार्या सुळेभावी (ता.जि.बेळगाव) येथे श्री महालक्ष्मी देवीचे जागरूक देवस्थान आहे. सदर मंदिरासह श्री क्षेत्र कलमेश्वर मंदिर परिसरात हिंदू देवदेवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमा अस्तव्यस्त अवस्थेत पडलेल्या होत्या.
दोन्ही ठिकाणच्या मिळून साधारणतः 300 च्या आसपास भग्न झालेल्या प्रतिमा होत्या. याबाबतची माहिती मिळताच बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते तथा सर्व लोकसेवा लोकसेवा फाऊंडेशन बेळगावचे अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ यांनी आज रविवारी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी भेट दिली.
हिरेमठ आणि त्यांच्या सहकार्यांनी भग्न झालेल्या सर्व प्रतिमांचे संकलित केल्या. तसेच पुन्हा अशा ठिकाणी आपल्या देवदेवतांच्या प्रतिमा नागरिकांनी टाकू नये, असे आवाहन केले. सदरच्या प्रतिमांचे विधिवत दहन करण्यात येईल असे सांगून नागरिकांकडे देव-देवतांच्या भग्न प्रतिमा असतील तर त्यांनी सर्व लोकसेवा लोकसेवा फाऊंडेशनशी संपर्क साधावा.
देवस्थान अथवा सार्वजनिक ठिकाणी कोठेही देवदेवतांच्या भग्न अवस्थेतील प्रतिमा टाकू नये. आपल्या देवदेवतांचे विटंबना थांबवावी, असे आवाहन विरेश हिरेमठ यांनी केले. यावेळी सुळेभावी गावचे ग्रामस्थ विनायक कुडचिमठ, दयानंद संबर्गीमठ, देवेंद्र गुदगणावर, सिद्दु पुजारी, राम पूजेरी, विठ्ठल प्रसन्नावर, लिंगय्या बुरलकट्टी, यल्लेश होळकर, बाळू कणबरकर, सचिन गौरीश हिरेमठ व सुळेभावी ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …