Tuesday , September 17 2024
Breaking News

कपिलेश्वर रोड शौर्य संघ ठरला श्रीमंगाईदेवी ट्रॉफीचा मानकरी

Spread the love

बेळगाव : कपिलेश्वर रोड शौर्य या संघाने मंगाईदेवी ट्रॉफी पटकाविली आहे. तर उपविजेता पिरनवाडीच्या सनसेट वॉरियर्स संघ ठरला. गेल्या पंधरा वर्षापासून वडगाव मंगाई देवी परिसरामध्ये श्री मंगाई ट्रॉफी या नावाने हाफ पीच क्रिकेट स्पर्धा भरविली जात आहे. यावर्षीही अशाच पद्धतीने ही स्पर्धा उत्साहात पार पडली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अभिषेक कलघटगी, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, समाजसेविका माधुरी जाधव, नगरसेविका दीपाली टोपगी, जयश्री कलघटगी, उमेश कुडाळकर, मारुती कुंडेकर, अमित कित्तूर, प्रसाद घाडी, सुनील सुतार, अनिकेत भोसले, सतीश धामणेकर, सिद्धार्थ धोंगडी, विश्वनाथ पाटील, हनुमंत पाटील, शंकर सोनटक्के, सुरज पाटील, शशी रजपुत, तुषार किल्लेदार, प्रथमेश धामणेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अभिषेक कलघटगी व महेश जुवेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व यानंतर समाजसेविका माधुरी जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांची मैदानात गर्दी झाली होती. शौर्य स्पोर्ट्स व सन सेट वॉरियर्स यांच्यात अंतिम सामना सुरू होण्या आधी मैदानामध्ये प्रमुख पाहुण्यांना खेळाडूंची ओळख करून देण्यात आली यानंतर नाणेफेक झाला. यावेळी अभिषेक कलघटगी यांनी विचार मांडताना सांगितले की, दोन्ही संघाने उत्तम खेळबाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यासाठी अशाच पद्धतीने संपूर्ण जगभरात वडगाव संघाचे नावलौकिक व्हावे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघाला रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मॅन ऑफ द सिरीज पटकावलेले सद्दाम कट्टी यांचा सत्कार करण्यात आला. व फायनल मॅन ऑफ द मॅच अजहर अश्रीफ तर बेस्ट बॉलर सोमनाथ, इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यश चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हार व जीत याबद्दल आपले विचार मांडले. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले श्री मंगाई स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन क्रिकेट स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडल्या याकरिता सर्वांचे कौतुक करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *