बेळगाव : बॉक्साईट रोड, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या चौघाजणांना एपीएमसी पोलिसांनी काल अटक केली असून त्यांच्याकडून रोख 3,840 रुपये जप्त केले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे समीर राजाकांत पठाण (वय 32, रा. शाहूनगर) बबन जयवंत जोशी (वय 36, रा. कंग्राळी खुर्द), सलीम निसार लष्करवाले (वय 45, रा. गांधीनगर) आणि इलियास रजाखान पठाण (वय 40, रा. काळी आमराई) अशी आहेत.
हे सर्वजण काल गुरुवारी बॉक्साईट रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांचा जुगार खेळत होते. त्यावेळी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय होनवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून उपरोक्त सर्वांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील रोख 3840 रुपये आणि पत्ते वगैरे जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta