Monday , December 15 2025
Breaking News

खानापूर

एकीसंदर्भातील उद्या होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली!

  बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी व्हावी यासाठी मध्यवर्ती समिती प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोमवारी शिवस्मारक येथे बोलविण्यात झालेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. याची दखल समिती कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून खानापूर तालुक्यात समितीमध्ये एकी व्हावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शनिवारी …

Read More »

पौरोहित्याने होतो बुद्धीचा विकास : क्षेत्रीय प्रमुख डॉ. गौरेश भालकेकर

  खानापूर : आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीदत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज रामगुरवाडी इदलहोंड (खानापूर) आयोजित एक दिवसीय पुरोहित, उद्गाता, धर्मप्रचारक कार्यशाळा रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत सरकारी मराठी शाळा रामगुरवाडी येथे संपन्न झाली. सद्गुरु नामावली, प्रार्थना …

Read More »

खानापूर शहरातील सांडपाणी मलप्रभेत सोडल्यास तीव्र आंदोलन

  खानापूर : खानापूर शहर परिसर उपनगराने व्यापला आहे. शहराची लोकवस्ती वाढत आहे. खानापूर शहरात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नाही. संपूर्ण शहराचे सांडपाणी हे मलप्रभा नदीमध्ये सोडण्यात येते. शहरात ड्रेनेजची सुविधा उपलब्ध नसल्याने या पाण्याचा निचरा देखील गटारीतूनच केला जातो. व हे पाणी मलप्रभेत सोडण्यात येते. नगरपंचायतीने हे सांडपाणी नदीमध्ये …

Read More »

खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांचा वाढदिवस साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांचा ५० वा वाढदिवस रविवारी दि. ६ रोजी खानापूर तालुका भाजपा कार्यालयाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी होते. प्रारंभी माजी भाजपा शहर अध्यक्ष राजेंद्र रायका यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर भाजप नेते …

Read More »

खानापूरात श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने आयोजित संगीत भजनी स्पर्धा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : श्री चौराशीदेवी संगीत कलामंच खानापूर तालुक्याच्यावतीने संगीत भजनी स्पर्धा रविवारी पाडल्या. या स्पर्धेत ३२ स्पर्धकांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक नारायण मयेकर होते. प्रास्ताविक एम. व्ही. चोर्लेकर यानी केले. तर दीपप्रज्वलन नगरसेवक नारायण मयेकर, राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी, शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, …

Read More »

समितीच्या “एकी”संदर्भात मध्यवर्ती अध्यक्षांना निवेदन!

  सोमवारी महत्वपूर्ण बैठक खानापूर : खानापूर तालुक्यात म. ए. समिती दोन गटात विखुरलेली आहे. दोन्ही गट एकत्र येण्यासाठी दोन्ही गटांशी चर्चा करुन एकिची प्रक्रिया पुढे नेण्यासंदर्भात सोमवार दि. ७ रोजी सकाळी ११ वा. शिवस्मारकातील सभागृहात मध्यवर्ती म. ए. समिती प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली आहे. गर्लगुंजी येथील माउली ग्रुप …

Read More »

खानापूरात उद्या श्री विठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा

खानापूर (प्रतिनिधी) : श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने खानापूर तालुका आयोजित खुला गट श्रीविठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा रविवार दि. ६ रोजी सकाळी ९ वाजता खानापूरातील केदार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप, प्रगतशील शेतकरी पुन्नाप्पा बिर्जे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दीपप्रज्वलन …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांचा राजीनामा

  केवळ सहा महिन्यासाठी नूतन नगराध्यक्ष खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून नगरसेवकांतून संघर्ष होता. अखेर शुक्रवारी दि. 4 रोजी नगराध्यक्ष मजहर खानापूरी यानी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी मजहर खानापूरी यांनी नगराध्यक्ष पदाचा भार …

Read More »

मौजे चापगाव (ता. खानापूर) येथे उद्या कुस्ती मैदान

  खानापूर : मौजे चापगाव (ता. खानापूर) येथे रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी ठीक 03:00 वा. महिला व पुरुष विभागात भव्य कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी कुस्तीपट्टुंनी याचा अवश्य लाभ घ्यावा. कुस्ती तालीम आधुनिक युगात बंद पडण्याच्या मार्गावर असून त्याची पुनश्च आवड निर्माण व्हावी, सदृढ युवक तयार …

Read More »

रोटरी ई. क्लबतर्फे शांतीनिकेतन शाळेत विशेष मार्गदर्शन

  खानापूर (प्रतिनिधी) : रोटरी ई. क्लबतर्फे खानापूर येथील शांतीनिकेतन इंग्रजी माध्यम शाळेमध्ये मासिक पाळी, स्वच्छता व व्यवस्थापन या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ३५० हून अधिक विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. रोटेरियन डॉ. अनिता उमदी यांनी विद्यार्थीनींना व्हिडीओ दाखवून सविस्तर माहिती सांगितली. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे (फाटक) व शिक्षिका …

Read More »