Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

शनिवारी-रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शनिवार दि. १९ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवार दि. २१ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद राहणार आहेत. सकाळी सहा …

Read More »

पहिल्याच पावसात खानापूर-जांबोटी क्राॅस रस्त्यावर पाणी

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर रस्त्यावर पाणी आल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशी वर्गाला व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने याची दखल घेऊन रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी सर्वथरातून तसेच शहरवासीयातुन होत आहे.जत-जांबोटी महामार्गावर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम …

Read More »

बेळगावात विहिंप-बजरंग दलातर्फे औषधी काढ्याचे वाटप

बेळगाव : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कणेरीमठात बनविण्यात आलेल्या काढ्याचे बेळगावात विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी विविध प्रकारची औषधे वाटण्याचा उपक्रम …

Read More »

डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनरीज असोसिएशनने दिला 21 रोजी आंदोलनाचा इशारा

बेळगाव : शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठ सुरू होण्यातील अनिश्चिततेमुळे गेल्या दीड वर्षापासून पुस्तक विक्री आणि स्टेशनरी व्यवसायावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. संबंधित दुकानदारांना मोठे नुकसान आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा येत्या सोमवार दि. 21 जून रोजी सरकारने घालून दिलेल्या वेळेत सरसकट सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जावी अन्यथा …

Read More »

कापोली ते कोडगई रस्त्याची दयनीय अवस्था!

रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समिती आंदोलन करणार खानापूर : कापोली ते कोडगई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने …

Read More »

भाडोत्री कृषी यंंत्रणाचे बिडीत उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : बिडी (ता. खानापूर) येथील रयत संपर्क केंद्रात शेतकरी वर्गासाठी भाडोत्री कृषी यंत्रसामुग्रीचे उद्घाटन सोहळा रविवारी दि. १४ रोजी पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ंटी कृषी निर्देशक शिवनगौडा पाटील, उपकृषी निर्देशक एच. डी. कोळेकर, ग्राम पंचायत अध्यक्षा शांता कुंडेकर, उपाध्यक्ष अंबुतली …

Read More »

म. ए. समितीच्या नेत्यांची कोविड सेंटरला भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर यांच्या संयुक्तविद्यमाने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट देऊन समाधान व्यक्त केले.यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व पीएलडी बॅंकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, बाॅड राईटर शामराव पाटील, महादेव …

Read More »

बांधकाम व्यवसायाला दिलासा द्या; क्रेडाई आणि सीसीईएची मागणी

बेळगाव : कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रावर मोठे संकट कोसळले आहे. कोरोनाचे गंभीर परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाले आहेत. सिमेंट व स्टीलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बांधकाम व्यवसायाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याकडे लक्ष देऊन केंद्र सरकारने लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलावीत आणि बांधकाम व्यवसायात दिलासा द्यावा, अशी मागणी क्रेडाई व …

Read More »

दरबार गल्लीमध्ये पोलिसांवर हल्ला

एक पोलीस जखमी; मारहाण करणारे तरुण पसार बेळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर सोमवारी रात्री काही टवाळखोरांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना दरबार गल्ली येथील अतिसंवेदनशील चौकात घडली. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाले आहेत. हल्ला करून पसार झालेल्या पाच हल्लेखोरांचा शोध मार्केट पोलीस घेत आहेत. सध्या बेळगावसह संपूर्ण कर्नाटक …

Read More »

खानापूर तालुका युवा समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना निवेदन सादर

बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले असता खानापूर युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि सीमाप्रश्नाबाबत आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. खानापूर युवा समितीने दिलेल्या …

Read More »